आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमी सतर्क असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक लोक कामाचे निमित्त सांगून आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांना विविध आजार लवकर जडतात. फिटनेस आणि सौंदर्य टिकविण्यासाठी नियमित व्यायाम, योगा तसेच योग्य आहार घेतला पाहिजे. तरच शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहू शकते.
हे लक्षात ठेवा
१) महिलांनी फिट राहण्यासाठी सौंदर्य टिकविण्यासाठी नियमित हिरवा भाजीपाला खावा.
२) किमान सात ते आठ तासांची झोप घ्या. नियमित व्यायाम करा.
३) वजन कमी करण्यासाठी कारले उपयुक्त असून कारल्याची अर्धवट कच्ची भाजी सेवन करा.
४) आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होते.
५) वजन कमी करण्यासाठी एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून तयार केलेले मिश्रण घ्या.
६) लाल तिखटातील कॅप्सासिन नावाचा घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हा घटक वेदनाशामक म्हणूनही फायदेशीर ठरतो.
७) गाजराच भरपूर सेवन केल्यानेही वजन कमी होते.
८) सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घ्या.
९) पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असल्याने दररोज पत्ताकोबीचा ज्यूस घ्यावा. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.
१०) पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते. यासाठी नियमित पपई खा.
११) दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले ताक प्यावे.