आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डासांमुळे मलेरियासह अन्य चार गंभीर आजार होऊ शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेकांचा समज असतो की, डासांमुळे केवळ मलेरियाच होतो, मात्र इतरही काही गंभीर आजार हे डासांमुळेच होतात. विशेषता पावसाळ्यात हे आजार होण्याचे प्रमाण खुप जास्त आहे.
चिकुनगुन्या
हा आजार झाला असता पेशींची संख्या वेगाने कमी होते. हृदयावर गंभीर परिणाम होतो. रक्तदाब कमी होतो. शरीरामध्ये प्रोटिनची कमतरता जाणवते. किडनीवर वाईट परिणाम होतो. हा आजार टाळण्यासाठी मच्छरदाणी वापरा. यामुळे तेथे डास होणार नाहीत. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा.
जपानी इन्सेफेलायटिस
मेंदूचा ताप या नावाने हा आजार ओळखला जातो. लहान मुलांना हा आजार मोठ्याप्रमाणात होतो. रुग्णांनी आराम केला नाही तर आजार बळावू शकतो. द्रव पदार्थ, पौष्टिक आहार घ्यावा. घर स्वच्छ ठेवा. पाणी उकळून प्यावे. शिळे अन्न खाऊ नये. डॉक्टरांकडे जा.
डेंग्यू
एडिज एजिप्टी डासांपासून याचा संसर्ग होतो. तापावर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाची अवस्था गंभीर होते. रोगप्रतिकारक्षमता कमी असल्यास तो लवकर होतो. पावसाळ्यामध्ये फुल शर्ट घाला. बूट घाला. शरीराचा कोणताही भाग उघडा ठेवू नका. घरात, परिसरात पाणी जमा होऊ देऊ नका.
झिका
हा आजार एडिज नावाचा डास चावल्याने होतो. ताप, सांधेदुखी, शरीरावर चट्टे अशी लक्षणे दिसतात. गर्भात असलेल्या बाळालासुद्धा हा आजार होऊ शकतो. ताप, घशात खवखव, सांधेदुखी, डोळे लाल होण्यासारखी लक्षणे दिसत असतील तर पातळ पदार्थ खावेत. भरपूर आराम करा. स्वच्छता ठेवा.