आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सतत तणाव, चिडचिड, शरीरात मोठ्याप्रमाणात पाण्याची कमतरता, आदी कारणांमुळे सुद्धा मायग्रेशनचा त्रास होऊ शकतो. अलिकडे मायग्रेनची समस्या वाढत चालली आहे. अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. मायग्रेनमध्ये डोकेदुखी होत असल्याने अनेकजण डोकेदुखीवर उपाय करतात. परंतु, मुळ त्रास दूर होत नाही. सरासरी ७ पैकी एका व्यक्तीस मायग्रेनचा त्रास होत असतो आणि त्याचे कारण जीवनशैलीत असते, असे संशोधकांना आढळून आले आहे.
ही आहेत ४ कारणे
१) मानसिक ताण, चिडचिड, अस्वस्थता, सततचे टेन्शन.
२) खूप कॉफी पिणे, डिहायड्रेशन.
३) जेवण टाळणे किंवा अवेळी जेवणे.
४) खूप गोड किंवा अती जंक फूड खाणे.
अशी घ्या काळजी
१) स्ट्रेस, टेन्शन, मानसिक अस्वास्थ्य असेल तर समुपदेशन घ्या.
२) गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
३) पाळीच्या दिवसांत किंवा हार्मोन्सचे असंतुलन असेल तर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
४) आहार, व्यायाम, चालणे आणि झोपणे यामध्ये शिस्त पाळा.
५) अती पेनकिलर्स घेऊ नका.
६) रोज वेळेवर जेवण करा. सतत जेवण करणे टाळा. भूक मारू नका. अपरात्री जेवणे, खूप वेळ उपाशी राहणे टाळा.
७) अती व्यसन करू नका.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)