आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा वाढण्याची विविध कारणे असतात. आपण दिवसभरात ज्या चूका करतो, निष्काळजीपण करतो त्यामुळे वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. अशा सवयींमुळे मेटाबॉलिज्म प्रक्रियेत अडथळा येतो. कोणत्या सहा वाईट सवयींमुळे वजन वाढू शकते, याची माहिती आपण घेणार आहोत.
१) व्यायामाचा कंटाळा
दरोरोज सकाळी व्यायाम करणे खुप गरजेचे आहे. कमीतकमी २० मिनिटे तरी यासाठी दिली पाहिजे.
२) अयोग्य आहार
सकाळी उपाशीपोटी उच्च कॅलरीयुक्त चिप्स, सँडविच, बर्गर इत्यादी पदार्थ खाल्ल्यास जलदगतीने फॅट वाढते.
३) पाणी न पिणे
सकाही व दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
४) जास्त झोप
सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने शरीरात कॉर्टिसोल स्टेस हार्मोन वाढतात. यामुळे चरबी वाढते.
५) सकाळचे उन न घेणे
सकाळचे उन अंगावर घेतले पाहिजे. या उन्हातील अल्टाव्हायलेट किरणांमुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होते.
६) नाष्टा न करणे
सकाळी नाष्टा न केल्याने फॅट बर्निंग प्रोसेस मंद होते. यासाठी सकाळी नाष्टा करावा, यामत प्रोटीन आणि कार्बोहायडेट्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा.