आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक लोकांना काकडी आवडते. काहीजण केवळ मीठ लावून काकडी खातात, तर काहीजण सलाडमध्ये नियमित काकडी खातात. यात मोठ्याप्रमाणात पोषकतत्व, व्हिटॅमिन, अँटीऑक्सीडंट आणि मेंदूला आरोग्यदायी ठेवणारे अनेक पदार्थ असतात. अनेक घरांमध्ये जवेणासोबत काकडी खाल्ली जाते. परंतु, रात्रीच्यावेळी काकडी कधीही खाऊ नये. यामागील कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१. रात्री जड पदार्थांचे सेवन केल्यास पचन होण्यास वेळ लागतो. यामुळे झोप खराब होते. गाजर, काकडीमुळे पचन लवकर होते, असे वाटते, परंतु, तसे नाही. काकडीत पाणी जास्त प्रमाणात असते. काकडी खाल्ल्याने पोट लवकर भरते, मात्र यामुळे झोप बिघडते.
२. ज्यांना पचनविषयक समस्या आहेत, अशा लोकांनी रात्री काकडीचे सेवन करू नये. काकडीतील कुकुरबिटानावचा एक घटक आढळतो, ज्याच्यामुळे अपचनाची समस्या वाढते.
अशी खा काकडी
* काकडीचे सेवन दिवसा करा.
* काकडी खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका.
* काकडी नेहमी जेवणापूर्वी २० ते ३० मिनिट अगोदर खा.
* रात्री चांगली झोप लागण्यासाठी हलका आणि आरोग्यदायी आहार घ्या.