आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर सलामत तो पगडी पचास, असे म्हटले जाते. आरोग्याच्या बाबतीत हे वाक्य आवर्जून ऐकवले जाते. जर तुमचे आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही स्पर्धेत टीकू शकता, ध्येय गाठू शकता, प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकता. मात्र, आरोग्यच बिघडले तर यापैकी काहीही करता येणार नाही. काही लोकांच्या कामाचे स्वरूपच असे असते की, त्यासाठी फिटनेस टिकविणे अनिवार्य असते. म्हणूनच सेलिब्रिटी फिटनेसला खूप महत्व देतात. फिटनेस टिकवण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१. झोप कमी झाल्यानेही वजन वाढते. तसेच झोप कमी झाल्याने सारखी चिडचिड होते. तणावाशी संबंधित हार्मोन्स शरीरातील पाणी प्रमाणापेक्षा जास्त वाढवतात. त्यामुळे वजन वाढते आणि झोप होत नाही. यासाठी शांत आणि पूर्ण झोप आवश्यक आहे.
२. नियमित व्यायाम करा. कंटाळा करू नका. अन्यथा वजन वाढेल.
३. नॉन व्हेज जेवणात जास्त पोषकतत्त्व तसेच फॅटही असतात, त्यामुळे नॉन व्हेज जास्त खाऊ नका. साधी पोळी भाजी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. आहारात डाळ, हिरवा भाजीपाला घ्या.
४. नियमित नारळपाणी प्या. यात फॅट्स आणि कॅलरी अजिबात नसते, यामुळे अतिरिक्त वजन वाढत नाही.
५. दही आणि अन्य डेअरी प्रॉडक्टस खाताना लो फॅट ऑप्शन्स निवडावेत.
६. महिला आपल्या प्रकृतीकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. पती आणि मुले यांची काळजी घेत असताना स्वत:कडे दुर्लक्ष करू नका.