आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुषांच्या कमरेच्या चारही बाजूचा घेर ४० इंचांपेक्षा जास्त आणि महिलांचा ४० इंचांपेक्षा जास्त असल्यास जास्त वजन मानले जाते. वजन जास्त असेल तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. लठ्ठपणामुळे हृदय, फुप्फुस, किडनी, यकृत, मेंदूसंबंधी आजार होऊ शकतात.
हे आहेत धोके
१) अतिरिक्त चरबी शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणारे हार्मोन्स निर्माण करतात. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
२) लठ्ठपणामुळे गुडघे, हिप्स आणि शरीराच्या मागील भागावर जास्त दबाव पडतो. यामुळे ऑस्टियो आर्थरायटिसची समस्या होऊ शकते.
३) लठ्ठपणामुळे रक्तशिरा संकुचित होतात. हृदययावर रक्त पंप करण्यासाठी जास्त दबाव पडतो आणि रक्तदाब उच्च होऊ शकतो.
४) ब्रेनपर्यंत ब्लड आणि ऑक्सिजन पोहोचवत असलेल्या नलिकांमुळे फॅट जमा होते. यामुळे ब्लड क्लॉटिंग होऊ शकते.
५) मानेच्या आजूबाजूची चरबी झोपताना श्वासनलिकेत अडचण निर्माण करते. स्लीप एप्निया म्हणजे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
६) लठ्ठपणामुळे ओटीपोटात सूज येऊ शकते. यामध्ये चरबी जमा होऊन खड्याचे रूप घेऊ शकते. कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात.
७) वाढलेल्या चरबीमुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. रक्तामध्ये ऑक्सिजन कमी होतो. कार्बनडायऑक्साइड जास्त होते.
८) नसांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचण्यात अडचणी येतात. यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
९) शरीरात जास्त चरबी आणि ग्लुकोजला इन्सुलिन नामक हार्मोन योग्य प्रकारे जाळू शकत नाही. यामुळे साखर वाढू शकते.
हा उपाय करा
* १) दोन मोठे चमचे दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून गरम करा. आता हे गार होऊ द्या आणि या मिश्रणाचे दोन भाग करा. एक भाग नाष्ट्यापूर्वी आणि दुसरा रात्री झोपण्यापूर्वी खा. यामुळे फॅट बर्निंग जलद होते. पोट कमी होते.