आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वृद्धांना गुडघेदुखीची समस्या जाणवते. मात्र, हीच समस्या जर तरूण वयात जाणवत असेल तर हा भविष्यातील आरोग्य समस्येचा इशारा असू शकते. तरूण वयात पाय दुखणे, गोळा येणे, गुडघे दुखणे, जिना चढताना दुखणे हे गंभीर लक्षण आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर वाढत्या वयात पश्चाताप अटळ आहे. यासाठी गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करु नये.
हे लक्षात ठेवा
१) रोज कमीतकमी तीस मिनिटे चाला. व्यायाम करा.
२) सूर्यप्रकाशात उभे रहा. यामुळे डीथ्री आणि कॅल्शिअम मिळते.
३) वेळीच डॉक्टरांना दाखवा.
४) योग्य आहार घ्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)