आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकजण फेसबुक, व्हॉट्स अॅप, इत्यादी सोशल मीडियावर (Social Media) सतत व्यस्त असतात. अर्धातास सुद्धा काही व्यक्ती सोशल मीडियापासून (Social Media) दूर राहू शकत नाहीत. सतत अपडेट घेणे, पोस्ट टाकणे, इतरांच्या पोस्ट लाईक करणे, असे त्यांचे उद्योग सुरू असतात. परंतु, ही सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी सरासरी ४८ वर्षांच्या पाच हजार दोनशे लोकांचा अभ्यास केला.
संशोधन आणि निष्कर्ष
१) या संशोधनात सहभागी व्यक्तींनी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरील परिणामांचे मापन १ ते ४ मध्ये नोंदवले. लाईफ सॅटिस्फॅक्शन १ ते १० मध्ये नोंदवले. तसेच बॉडी मास इंडेक्सची माहिती दिली होती.
२) संशोधनात सहभागी व्यक्तींच्या फेसबुकच्या डेटावरून त्यांचे फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याची सवय आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याची सवय याचा अभ्यास करण्यात आला. या सवयीचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर होणारा परिणाम तपासण्यात आला.
३) फेसबुक सतत स्टेटस अपडेट करणे, इतरांच्या पोस्ट लाईक करणे,
यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
४) दिवसातून १० वेळा फेसबुक चेक करणे हे एका आजारापेक्षा कमी नाही.
तुम्ही सुद्धा सतत असे करत असल्यास तुम्हाला सुद्धा हा आजार जडलेला असू शकतो.
Dengue symptoms | Dengue virus | डेंग्यू म्हणजे काय? लक्षणे कोणती? उपचार जाणून घ्या
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे