आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी फायबर महत्वाची भूमिका पार पाडते. काळ्या चण्यात फायबर जास्त प्रमाणात असते. सोबतच यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असते. चण्यात फायबर असल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे खुप वेळ भूक जाणवत नाही. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. वजन नियंत्रणात राहते. शिवाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या
काळे चने सेवन करण्याचे फायदे
1. हृदयासाठी लाभदायक
यातील अँटी ऑक्सीडेंट्स आणि फायटो हेल्दी ब्लड व्हेसल्स मेंटन करण्याचे काम करते. तणाव कमी करते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. यातील फोलेट आणि मेग्नेशियममुळे आर्टरीज आकुंचन होण्याची शक्यता कमी होते. यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम
2. भरपूर आयर्न
काळ्या चण्यात भरपूर आयर्न असल्याने शरीरात अॅनिमियाची समस्या होत नाही, एनर्जी मिळते.
3. प्रोटीन
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. शाकाहारी लोकांसाठी उपयुक्त आहे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करावा समावेश, ब्लड शुगर लेव्हल राहील कंट्रोलमध्ये
ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुळवेल’चे सेवन, वेगाने ब्लड शुगर लेव्हल होईल कमी