आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपले आरोग्य (Health) बर्याच लहान गोष्टी आणि सवयींवर अवलंबून असते. त्याच प्रकारे बर्याच छोट्या गोष्टींमुळे आजारी पडू शकतो. डासांच्या चावयाने तुम्हाला डेंग्यू (dengue symptoms) आणि मलेरियासारखे (Malaria) आजारही होतात. dengue symptoms | what are the common symptoms of dengue in marathi
डेंग्यू म्हणजे काय ?
डेंग्यू हा एक ताप आहे, जो डासांद्वारे होणारा विषाणूजन्य आजार आहे. ज्यामुळे डोकेदुखी, उच्च ताप, शरीरावर वेदना यासारख्या समस्या उद्भवतात. डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूचा संसर्ग किंवा आजार आहे ज्यामध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, त्वचेवर पुरळ येतात.
एडीस इजिप्ती डासांच्या मादीच्या चाव्याव्दारे डेंग्यू होतो. डेंग्यू एक विषाणू आहे. तथापि, हे विषाणू 10 दिवसांपेक्षा जास्त काळ जगत नाहीत. परंतु दुर्लक्ष केल्यास घातक ठरतात. रक्तस्त्राव, रक्तदाब अचानक खाली येणे आणि शेवटी मृत्यू होऊ शकतो.
डेंग्यूची लक्षणे कोणती? (dengue symptoms )
डेंग्यू तीव्र आणि सौम्य दोन्हीही असू शकतो. संसर्ग झाल्यास, त्याची लक्षणे 4 ते 5 दिवसांत दिसतात. सौम्य लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, स्नायू, हाडे आणि सांध्यामध्ये वेदना, उलट्या होणे, मळमळ होणे, डोळ्यांमध्ये वेदना, त्वचेवर पुरळ उठणे, ग्रंथींमध्ये सूज येणे इ.
–
डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे दिसताच करा उपचार
– संपूर्ण रक्त चाचणी करा, जी शरीरात प्लेसलेटच्या स्थितीबद्दल माहिती देते. यावर आधारित, डॉक्टर आपल्यावर उपचार करतात.
– डेंग्यू एनएस 1 एजीसाठी एलिसा चाचणी घ्या. या रक्त चाचणीत डेंग्यू विषाणूचे (Dengue virus) प्रतिजन दिसते.
पीसीआर चाचणी करा (PCR testing)
सीरम आयजीजी आणि आयजीएम चाचण्या करा. हे शरीरातील अन्टीबॉडीजच्या उत्पादनाची पातळी याबद्दल माहिती देते.
– पाणी आणि ओआरएस प्या.
भोजन करताना विशेष काळजी घ्या. सूप, नारळपाणी, डाळिंब इत्यादी जास्त प्रमाणात खा, खिचडी आणि ओटचे पीठ खा.
Wab Title :- dengue symptoms | what are the common symptoms of dengue in marathi
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Health Tips | उन्हाळ्यात सफरचंदासारख्या ‘या’ फळाच्या सेवनाने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या