आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Brain | पदार्थाचा रंग आणि चव वाढविण्यासाठी हळदीचा वापर शेकडो वर्षांपासून केला जात आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदातही हळदीला खुप महत्व आहे. हळदीमध्ये मेंदूचे (Brain) आजार स्वत:हून बरे होण्याची आणि क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.
संशोधनातील निष्कर्ष
1) हळदीवरच्या या गुणकारी संशोधनामुळे अल्झायमर आणि मेंदूच्या इतर विकारांवर औषध बनविण्यात मदत होऊ शकते.
2) मनुष्याच्या मेंदूवर हळदीच्या होणाऱ्या परिणामाबाबत अधिक संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे.
3) मानवासह इतर विकसित प्राण्यांमध्ये मेंदूतील बिघाड दुरुस्त करण्याची क्षमता नसते, मात्र मासे व इतर छोट्या प्राण्यांमध्ये ही क्षमता तुलनेने अधिक असते. या संशोधनामुळे मानवामध्येही ही क्षमता विकसित होण्याची शक्यता आहे.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस