टेक्सास : वृत्तसंस्था – अमेरिकेतील (America) टेक्सास (Texas) मध्ये एक व्यक्ती दुर्मिळ मंकीपॉक्सने संक्रमित (Monkeypox) आढळला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (CDC) ने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. अशाप्रकारे टेक्सासमध्ये समोर आलेली (Monkeypox in Texas) पहिली केस आहे.
हा वायरल आजार एका अमेरिकन रहिवाशात (US resident) आढळला, ज्याने नुकताच नायजेरिया (Nigeria) ते अमेरिका (United States) प्रवास केला होता. सध्या त्याला डल्लास (Dallas) मध्ये भरती केले आहे.
डल्लास काऊंटी जज क्ले जेनकिन्स यांनी म्हटले, हे प्रकरण दुर्मिळ असूनही ही केस धोक्याची घंटा नाही. सध्या या आजाराने सामान्य लोकांसाठी कोणताही धोका नाही. नायजेरियाशिवाय, या आजाराचा प्रकोप मध्य आणि पश्चिम अफ्रीकन देशांमध्ये 1970 मध्ये दिसून आला होता.
CDC नुसार, अमेरिकेत मंकीपॉक्सचा कहर 2003 मध्ये पहायला मिळाला होता. सीडीसीने म्हटले की, ते एयरलाईन, राज्य आणि स्थानिक आरोग्य अधिकार्यांसोबत काम करत आहेत, जेणेकरून त्या प्रवाशांचा आणि इतर लोकांचा शोध घेता येईल, जे रूग्णाच्या संपर्कात आले होते.
श्वासाच्या कणांपासून पसरण्याचा धोका
मंकीपॉक्स वायरस हा स्मॉलपॉक्स कुटुंबाशी संबधीत आहे. मंकीपॉक्स एक दुर्मिळ परंतु संभाव्या गंभीर वायरल आजार आहे, जो सामान्यपणे फ्लूसारखी लक्षणे आणि लिम्फ नोड्सच्या सूजपासून सुरू होतो.
यानंतर हळुहळु चेहरा आणि शरीरावर मोठ्या संख्येने दाणे दिसू लागतात. हा श्वास घेताना निघणार्या ड्रॉपलेट्सद्वारे एका मनुष्यातून दुसर्या मनुष्यात पसरू शकतो. सीडीसीने म्हटले की, कोविड-19 मुळे प्रवाशांनी मास्क घातला होता, या कारणामुळे विमान आणि एयरपोर्टवर श्वासाच्या कणाद्वारे मंकीपॉक्स पसरण्याचा धोका कमी आहे.
अगोदर समोर आल्या होत्या मंकीपॉक्सच्या 6 केस
सीडीसीने म्हटले, रूग्ण व्हायरसच्या त्या स्ट्रेनने संक्रमित झाला आहे,
जो नायजेरियासह पश्चिम अफ्रीकन देशांमध्ये सामान्य आहे.
सीडीसीनुसार, नवीन प्रकरणाशिवाय नायजेरिया,
ब्रिटन, इस्त्रायल आणि सिंगापुरहून परतणार्या किमान सहा प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे रिपोर्ट केली गेली आहेत.
नवीन केस मागील प्रकरणांशी संबंधीत नाही.
कोरोना व्हायरसदरम्यान अशा प्रकारचा आजार समोर येणे एक मोठा धोका होऊ शकतो.
तो सुद्धा अशावेळी जेव्हा अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.
बहुतांश नवीन प्रकरणे कोविडच्या डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) संबंधीत आहेत.
Web Titel :- monkeypox in us texas records first case of monkeypox in man returning from nigeria
clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय
Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या