आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मद्यसेवन (Alcohol consumption) हे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरु शकते. मद्य (Alcohol consumption) सेवनाने केव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यामुळे हृदयासंबंधित इतर आजार सुद्धा वाढू शकतात. कमी प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास हृदयविकार होत नाही, असे काही संशोधकांनी म्हटले होते. मात्र, अमेरिकेच्या संशोधकांनी हा मुद्दा खोडून काढला आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी म्हणजेच जेएसीसी या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.
हे लक्षात ठेवा
– अल्कोहोलच्या सेवनामुळे हृदयरोगाचा धोका अधिक बळावतो.
– अल्कोहोलच्या सेवनामुळे उत्तेजित होणे, छातीत धडधडणे यामुळे हा धोका अधिक बळावतो.
– अल्कोहोलचे सेवन हे हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांसाठी घातक आहे.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस