आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Stretch marks | प्रेग्नंसी, टीनएजमधील हार्मोनल चेंजेस, अचानक वजन वाढणे, वजन कमी होणे, इत्यादी कारणामुळे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर, स्ट्रेच मार्क (Stretch marks) येतात. प्रेग्नंसीनंतर महिलांना स्ट्रेच मार्क येण्याचे प्रमाण जास्त असते. हे घालविण्यासाठी घरच्याघरी काही उपाय करता येऊ शकतात.
हे उपाय करा
1) कोको बटर किंवा कोरफडयुक्त मॉयश्चरायझर नियमित वापरावे. सम प्रमाणात कोरफड आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घरच्या घरी मॉयश्चरायझर तयार करावे.
2) जूने स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी व्हिटॅमिन इ युक्त तेलाचा वापर करावा. यामुळे त्वचा सुरक्षित राहते.
3) कोरफड कापून त्याच्यातील गर स्ट्रेच मार्कवर लावा. नियमित हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क हळूहळू कमी होतात. कोरफडीचा गर व्हिटॅमिन इ ऑइल मध्ये घालून लावू शकता.
4) रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल थोडे गरम करून स्ट्रेच मार्कवर लावावे. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करावी. अथवा ऑलिव्ह ऑइल आणि खोबरेल तेल एकत्र करून लावावे.
5) एरंडेल तेल वापरताना कोमट करून स्ट्रेच मार्कवर लावावे. कपडा गरम पाण्यात ओला करून त्याभोवती गुंडाळून ठेवावा. वाफेमुळे त्वचेचे पोर्स ओपन होऊन तेल आत मुरते.
6) दोन अंड्यांचा पांढरा भाग घेऊन स्ट्रेच मार्कवर जाडसर लावा.
थर पूर्णपणे सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. नंतर ऑलिव्ह ऑइल लावा.
7) लिंबाचा रस सावकाश स्ट्रेच मार्कवर लावा. १० मिनिटे ठेऊन गरम पाण्याने धुवून टाका.
दिवसातून १-२ वेळा हा उपाय करा.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस