आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाच्या धावपळीत पुरूष नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम कालांतराने दिसून येतात. काही आजार तर तरूणपणातच पाठलाग करू लागतात. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा असे अनेक आजार तरूण वयातच पुरूषांना विळखा घालत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पुरूषांनी नेहमी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असले पाहिजे. पुरुषांनी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
१. तोंडाची स्वच्छता
तोंड स्वच्छ न ठेवल्यास तोंडाची दुर्गंधी येते. तसेच मधुमेह, यकृत, किडनीच्या समस्या, अॅसिडिटी आदी आजार होऊ शकतात.
२. कमजोरी
ह्रदयविकार, थॉयराइड, लोहाची कमतरता, या समस्यांमुळे थकवा येऊ शकतो.
३. घाम येणे
थॉयराइड आणि मेटाबॉलिज्मच्या समस्येने जास्त प्रमाणात घाम येतो. हे लक्षण दिसल्यास वेळीच उपाय करावेत.
४. डोकेदु:खी
डोकेदु:खीचा त्रास सतत जाणवत असल्यास शरीरातील पाण्याच्या कमतरता, ह्रदय आणि मेंदूशी संबंधीत आजार होऊ शकतात.
५. छाती, खांदेदु:खी
कमजोरी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, छाती किंवा खांदेदु:खीचा संबंध थेट ह्रदयविकाराशी असू शकतो.
६. त्वचेची खाज
त्वचेच्या विकारासह यकृत, किडनीची समस्या होऊ शकते. तसेच मधुमेहामुळेही त्वचेला खाज येते.
७. शौचासंबंधी समस्या
लूज मोशन, मोशनमध्ये बदल, अॅसिडिटी किंवा पोट फुगणे यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.
८. ताणतणाव
सततच्या ताणतणावामुळे डिप्रेशन, एंक्झायटी आणि ह्रदयासंबंधी आजार होतात.
९. लघवीसंबंधी समस्या
लघवीला जळजळ, वारंवार लघवी होणे, या समस्यांमुळे मधुमेह, किडनी किंवा यकृताचा विकार होऊ शकतो.
१०. पाठदुखी
सतत पाठदु:खी होत असल्यास किडनी स्टोनची समस्या असू शकते.