आरोग्यनामा ऑनलाइन टीम – knee pain home remedies | गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने गुडघेदुखीचा (knee pain home remedies) त्रास होतो. वृद्धावस्थेत हाडांमधील वंगण आणि शरीरातील फॉस्फरस तत्व कमी झाल्याने हा त्रास होतो. अयोग्य आहार, मानसिक तणाव, शरीरात रक्ताची कमतरता, भीती, शंका, रोग इत्यादी कारणांमुळे सुद्धा ही समस्या होते. आहारात काही बदल करून आणि घरगुती उपाय केल्यास या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.
हे उपाय करा
– दोन आठवडे जेवणात काकडी आणि लसूण यांचे सेवन करा. यामुळे गुडघ्याच्या वेदना दूर होतात.
– मोहरीच्या तेलात २ चमचे ओवा, ४ लसणाच्या पाकळ्या, २ अफीम आणि १ चमचा खसखस करुन वाटावे. या तेलाने गुडघ्यांची मालिश केल्याने दुखणे दूर होते.
– पाण्यात थोडेसे मीठ टाकून गरम करा. यापाण्यात एक कापड भिजवून त्याने गुडघ्याला १० मिनिटे शेक घ्या. काही दिवसात गुडघेदुखी कमी होते.
– अद्रक, सुंठ, काळीमिरी, मीठ आणि मध समप्रमाणात बारिक करून चूर्ण तयार करा.
हे चूर्ण ४ ग्रॅम मधासोबत घ्या.
– कच्चा बटाटा खिसून गुडघ्यावर लावा. यामुळे गुडघेदुखी थांबते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे