आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मांसाहार अतिप्रमाणात केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे फर्टिलिटी रेट कमी होऊ शकतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे. पशु, प्राणी यांना लवकर मोठे करण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिले जाते. अशा प्राण्यांचे मांस खाल्ल्याने अनेक व्याधी होतात. याचा सर्वाधिक धोका महिलांना असतो. कारण यामुळे त्यांचा फर्टिलिटी रेट कमी होतो.
ही आहेत कारणे
* चिकन खाताना आपल्या शरीरात थोडथोड्या प्रमाणात ऑक्सिटोसिन जाते. यामुळे डीएन आणि हार्मोन्स बॅलेन्स बिघडतो. यामुळे फर्टिलिटी रेट कमी होतो.
* कोंबड्याचे म्हणजेच नराचे मांस अतिप्रमाणात सेवन केल्याने महिलांमध्ये नर हार्मोन्स वाढते. यामुळे महिलांच्या शरीरातील सर्व हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे महिलांचे मातृत्व गुण धोक्यात येतात.
हे आहेत उपाय
१. यासाठी चिकन खाणे बंद करावे.
२. चिकन खायाचे असल्यास ऑर्गेनिक फॉर्ममधून घ्यावे.
३. फळ आणि हिरव्या भाजीपाल्याचे सेवन अधिक करावे.
४. कपालभाति प्राणायाम करावे.