आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फुफ्फुस हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. यामुळे शरीराच्या विविध क्रिया सुरळीत सुरू असतात. फुफ्फुसांचे आरोग्य बिघडले तर त्याचा परिणाम ताबडतोब शरीरावर दिसून येतो. दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रमामुळे फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो. श्वास घेण्यास त्रास, श्वसनाचे विकार, आदी समस्या होऊ शकतात. कोणते पदार्थ सेवन केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहू शकते, याविषयी जाणून घेवूयात.
हे पदार्थ सेवन करा
1 हळद
हळदीचा नियमित सेवनाने शरीराच्या व्याधी कमी होतात.
2 आले
आले सेवन केल्यास फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. दररोज आल्याच पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
3 ब्रोकली
दररोज अर्धा कप ब्रोकलीचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.
4 लसूण
लसूण फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहे. फुफ्फुसांचा कॅन्सर असणार्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो.
5 पालक
दररोज एक कप पालक खाल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
6 सफरचंद
नाश्त्यामध्ये दररोज एक सफरचंद खाल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते.