आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्लास्टिकच्या डब्यातील अन्न खाणे हे आरोग्यासाठी खुप हानिकारक आहे. यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. तसेच डायबेटिसचा धोका सुद्धा वाढू शकतो. इतर आजारही यामुळे होऊ शकतात. यासाठी मुलांना शाळेत जाताना तसेच ऑफिसला जाताना प्लस्टिक डब्यात अन्न देऊ नका. प्लास्टिक डब्यातील अन्न खाल्ल्याने कोणते धोके निर्माण होतात, यासंदर्भात जाणून घेवूयात.
हे आहेत धोके
१) प्लास्टिक पदार्थातील अन्न सेवन केल्याने शरीरातील थॅलेट्सचे प्रमाण वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
२) पाश्चात्य देशात याचा वापर जास्त होत असल्याने तेथील लोकांच्या शरीरात थॅलेट्सचे प्रमाण अधिक आढळून येते. त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणामही तुलनेने जास्त आहे.
३) प्लास्टिकच्या संपर्कात असलेले खाद्यपदार्थ सतत खाल्ले तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.
४) ब्लड प्रेशरच्या संदर्भातील तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
५) डायबेटिसचा धोका वाढू शकतो.
६) यामुळे इतर आजारही वाढू शकतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)