आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे म्हटले जाते. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुद्धा हे खरे आहे. मेंदु आणि शरीर यांच्या आरोग्यासाठी भरपूर झोप आणि योग्य आहार आवश्यक असला तरी झोप किती घ्यावी, याचे तास ठरलेले आहेत. प्रौढ लोकांनी सात ते आठ तास झोपावे, असे सांगितले जाते. मात्र, काही लोक त्यापेक्षाही जास्त झोप घेतात. यामुळे कँसरसारख्या गंभीर आजाराची शक्यता बळावते, असे चीनमधील हुआझाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
काय म्हटले आहे संशोधनात
१) दीर्घकाळ रात्रपाळीत काम करणारे व नंतर दिवसा अपुरी झोप घेणारे आणि रात्री दहा तासांपेक्षा जास्त झोप घेतल असलेल्या पुरुषांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
२) दिर्घकाळ रात्रपाळीत काम करत असलेल्या लोकांना कॅन्सर होण्याचा धोका २७ टक्के जास्त असतो.
३) रात्रपाळी करून दिवसा व्यवस्थित झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये कॅर्करोगाचा धोका दुप्पटीने अधिक असतो.
४) विशेष म्हणजे रात्री झोपूनही नियमित दहा तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्या लोकांमध्येसुद्धा कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे आढळले.
५) झोप आणि कॅन्सरचा असा परस्पर संबंध केवळ पुुरुषांमध्येच आढळतो. महिलांच्या बाबतीत मात्र तो दिसून येत नाही.
६) प्रमाणात आणि शांत झोप घेणे गरजेचे असल्याचे, या संशोधकांनी म्हटले आहे.