आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गवारची भाजी चविष्ट असते, अनेकजण ही भाजी नियमित खातात. पण, अनेकांना या भाजीतील औषधी गुणधर्माबाबत माहिती नसते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून यामुळे विविध आजार बरे होऊ शकतात. गवारच्या शेंगांमध्ये प्रोटीन, फायबर, फॉलिक अॅसिड, मिनरल्स, फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम, व्हिटॅमिन के, सी, ए आणि कार्बोहायड्रेट सारखे पोषकतत्व आढळतात. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. या भाजीचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 हृदयरोग
गवारच्या शेंगांचा रस शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करतो. यातील फायबर, पोटॅशिअम आणि फोलेटमुळे हृदयाशी संबंधित वेगवेगळ्या समस्या दूर होतात.
2 हाडे
यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात. तसेच यातील फॉस्फोरसने हाडे निरोगी राहतात.
3 तणाव, चिंता
यातील हायपोग्लाइसेमिक तत्व नसांना शांत ठेवते. चिंता, तणाव कमी होतो. मानसिक शांती मिळते.
4 लठ्ठपणा
यात कमी कॅलरी असल्याने वजन कमी होते. यात वजन नियंत्रित करण्याची क्षमता यात आहे.
5 ब्लड शूगर
डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही भाजी लाभदायक आहे. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत होते.
6 ब्लड सर्कुसेलन
यामध्ये आयर्न अधिक असल्याने हिमोग्लोबिन लेव्हल वाढते. फायटोकेमिकल्सने ब्लड सर्कुलेशन सुधारते.