आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी अथवा नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण रोज कोणता तरी व्यायाम करत असतात. मात्र, यासाठी चालणे हा अतिशय योग्य व्यायाम आहे. कारण, चालण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तुम्ही रोज किती अंतर चालता, यावर तुमच्या किती कॅलरीज बर्न होतात हे आवलंबून आहे. सामान्य माणसाने दिवसभरात दहा हजार पावले चालावे. यामुळे दररोज सुमारे पाचशे कॅलरीज बर्न होतात.
हे लक्षात ठेवा
१. सत्तर किलो वजन असलेली पंचेचाळीस वर्षांची व्यक्ती जर ताशी तीन ते पाच मैल या वेगाने चालत असेल तर दहा हजार पावले चालल्यानंतर त्या व्यक्तीच्या सुमारे चारशे ते पाचशे कॅलरी जळतात.
२. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज किती कॅलरी खाता आणि किती बर्न करता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणात चालण्याची तीव्रता वाढवावी लागेल.
३. चालण्याची सुरुवात हळूहळूच करा. आपण किती अंतर चाललो हे सांगणारे अनेक अॅप्स सध्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतात. एमपीथ्री प्लेअर्समध्येही त्याचा उपयोग करता येतो.
४. काही शूजमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
५. पेडोमीटर वापरल्यास सुद्धा तुम्ही किती अंतर चाललात हे समते. यामुळे किती चाललात, किती कॅलरीज बर्न झाल्या हे समजू शकते. तसेच टार्गेट पूर्ण करण्यासाठी उपयोग होईल, उत्साह वाढेल.
६. रोज दहा हजार पावले चालायची आहे याचा सतत विचार करू नका. निसर्गाचा आस्वाद घेत चाला. यामुळे दहा हजार हजार पावले कधी पूर्ण होतील हे कळणार सुद्धा नाही.
७. पहिल्याच दिवशी दहा हजार पावले चालू नका. सुरूवातीला कमी अंतराने सुरूवात करा. मग हळूहळू अंतर वाढवत जा.