आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रोजच्या जेवणामध्ये कांद्याचा वापर केला जातो. शिवाय, अनेकजण कच्चा कांदाही खातात. सलाडमध्ये कांदा वापरला जातो. असंख्य पदार्थ हे कांद्याशिवाय तयार होऊच शकत नाहीत. या लाल रंगाच्या कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. लाल कांद्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 हृदयाचे आजार होत नाही.
2 प्रोटेस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
3 खराब कोलेस्टेरॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढवितो.
4 हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
5 केसाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतो. केसगळतीवर उपयोगी आहे.