आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक लोकांना सकाळी उठल्या-उठल्या चहा पिण्याची सवय असते. हे प्रमाण सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के एवढे मोठे असल्याचे सांगितले जाते. शहर असो की खेडेगाव सर्वत्र ही सवय दिसून येते. परंतु, ही सवय खुप घातक आहे. चहातील कॅफिनमुळे सकाळी चहा घेतल्यानंतर तरतरी येते, पण त्याचे गंभीर परिणाम सुद्धा होतात. सकाळी चहा घेण्यापूर्वी काहीतरी खावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
हे आहेत धोके
१) लवकर थकवा जाणवतो. मूड-स्विंगचा प्रॉब्लेम वाढतो.
२) सतत गरम चहा पिल्याने धोका अधिक वाढतो.
३) अल्सर होण्याची शक्यता असते.
४) पित्त रस बनण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. उचकी लागते. ह्रदयावर दाब पडल्यासारखे वाटते.
५) ब्लॅक टी पिल्याने पोट फुलते. भूक लागत नाही.