आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या डिप्रेशनच्या समस्येचे प्रमाण वाढले आहे. हा मानसिक आजार अनेकदा जीवघेणा ठरतो. जीवनातील विविध प्रकारचे अपयश हे यामागील प्रमुख कारण असते. डिप्रेशनची समस्या वेळीच उपाय केल्यास कमी करता येणे सहज शक्य आहे. यासाठी यामागील कारणे जाणून घेणे महत्वाचे आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोन सुद्धा डिप्रेशनचे कारण ठरू शकतो.
ही आहेत कारणे
1 डिप्रेशनमध्ये असताना काहीजण विविध व्यसनांच्या आहारी जातात. डिप्रेशनमध्ये अनेकांना स्मार्टफोनचेही व्यसन लागते.
2 एखादी व्यक्ती जर इमोशनली विक असेल तर तिला स्मार्टफोनचं व्यसन चटकन लागते, असे संशोधनात आढळून आले आहे.
3 एका मर्यादेपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणे हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या घातक ठरते.
4 जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनसोबत घालवणे घातक आहे.
5 एकांतात असलेली व्यक्ती विचारात असते. अशावेळी इतर लोकांच्या तुलनेत ती व्यक्ती इमोशनली देखील विक असते.
6 अशावेळी एखाद्या गोष्टीची सोबत मिळावी म्हणून ती व्यक्ती स्मार्टफोनसोबत वेळ घालवते.