आरोग्यनामा ऑनलाईन – महिलांना एकाच वेळी अनेक प्रकारची कामे करावी लागतात. नोकरी, उद्योग करणार्या महिलांची खुपच धावपळ उडते. या धावपळीत त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. महिलांना आरोग्य चांगले राखण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. काही खास पदार्थांचा त्यांनी डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्य चांगले राहू शकते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे नियमित सेवन करा
1 वेलची
यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोज एक वेलची खाल्याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगली राहते.
2 लसून
रक्तप्रवाह सुरळीत होतो. कॅन्ससारख्या आजारांपासून बचाव होतो.
3 पाणी
पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. वजन कमी होते.
4 सलाड
टॉमेटो, काकडी नियमित खाणे फायदेशीर आहे.
5 दूध
भरपूर प्रमाणात पोषण आणि ऊर्जा मिळते. वजन वाढण्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.
6 फळे
रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आजारांपासून बचाव होतो.
7 हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. शरीराला पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात.