आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Vitamin C Side Effects | कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी अद्याप कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने आरोग्य तज्ज्ञ लोकांना आपली इम्यूनिटी वाढवण्यास सांगत आहेत. यासाठी काही लोक देशी उपाय करत आहेत, तर काही लोक व्हिटॅमिन सी चे भरपूर सेवन करत आहेत. परंतु लोकांना हे माहित नाही की व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनाने साईड इफेक्ट (Vitamin C Side Effects) सुद्धा होऊ शकतात. व्हिटॅमिन सी जेवढे आरोग्याला चांगले आहे तेवढेच धोकादायक सुद्धा आहे. याचे कोणते साईड इफेक्ट आहेत ते जाणून घेवूयात…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या
1. मळमळणे
व्हिटॅमिन सी च्या गोळ्या जास्त खाल्ल्याने मळमळ किंवा जीव घाबरणे अशा समस्या होऊ शकतात. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करा.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत
2. अब्डॉमिनल क्रॅम्प
व्हिटॅमिन सी चे जास्त सेवन केल्याने पोटात वेदना सुद्धा होऊ शकतात. व्हिटॅमिन सी जर जास्त घेतले तर पचनक्रिया सुद्धा प्रभावित होते.
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
3. उलटी-अतिसार
व्हिटॅमिन सी ची गोळ्या जास्त सेवन केल्याने डायरियाची समस्या होऊ शकते. उलटी-अतिसार तसेच बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. यामुळे शरीर डीहाइड्रेटसुद्धा होऊ शकते.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
4. हार्ट बर्न
व्हिटॅमिन सी च्या सर्वात घातक साईड इफेक्टमध्ये हार्ट बर्नच्या समस्येचा समावेश आहे. छातीत जळजळ झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
5. निद्रानाश किंवा डोकेदुखी
व्हिटॅमिन सी च्या गोळ्या जास्त घेतल्याने निद्रानाश आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते. थकवा, बेचैनी वाढू शकते.
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
रोज केवळ इतके खा व्हिटॅमिन सी
शरीराची इम्यूनिटी वाढवण्यासाठी दररोज 65-90 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी घेतले पाहिजे. एका दिवसात 2000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त घेतलेले व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डब्ल्यूएचओ नुसार घरी तयार केलेले जेवणच सर्व आवश्यक पोषकतत्वांचे माध्यम आहे. डब्ल्यूएचओने इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी चा दावा नाकारला आहे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या