आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात पुदीनाला (Pudeena ) संजीवनी औषधी वनस्पती म्हटलं आहे, कारण चव, सौंदर्य आणि सुगंध असे संगम फारच कमी रोपांमध्ये दिसून येते. या वनस्पतीचे आयुष्य खूप असते. पुदीना (Pudeena ) एक बारमाही वनस्पती आहे, ही १२ महिने कधीही वापरली जाऊ शकते.
सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच
१) दातदुखी –
पुदीनाची दोन ते चार पाने चघळल्याने दातदुखी, पायरिया आणि हिरड्यांचा त्रास नाहीसा होतो.
२) तोंडाची दुर्गंधी –
तोंडात दुर्गंधी येत असेल तर पुदिनाची चार-पाच पाने एक ग्लास पाण्यात उकळा आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होतो.
३ ) गॅसची समस्या –
चेहऱ्यावर मुरूम येत असल्यास किंवा पोटात गॅस झाला असल्यास आपण पुदिना चहा पिणे फायद्याचे आहे.
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या
४) चेहऱ्यावरील सुरकुत्या –
पुदिन्याच्या पानांचा लेप बनवून त्याची वाफ घेतल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
५) थकवा –
जेव्हा आपल्याला थकवा जाणवेल तेव्हा पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून त्यात पाय टाकावे. आपल्याला थोड्याच वेळात आराम मिळेल.
कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…
६) हिचकी –
पुदीनाचा रस मधात टाकून चाटल्यास हिचकी कमी होते.
७) खोकला –
बदलत्या हंगामात खोकल्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर पुदीना चहामध्ये २ चिमूटभर मीठ टाकल्यास आराम मिळतो.
फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask