आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपूर्वी प्लास्टिकच्या अंडी बाजारात आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. देशभरात अशी अंडी आढळून आली असून महाराष्ट्रातही असे प्रकार घडत आहेत. खऱ्या अंड्यांसारखी दिसणारी ही प्लास्टिकची अंडी आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. बाजारातून आणलेली अंडी खरी की खोटी हे कसे ओळखावे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
अशी ओळखा अंडी
१. जिलेटीन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी प्लास्टिक अंड्याचा पिवळा भाग बनवला जातो.
२. प्लास्टिकचे अंडे आगीजवळ नेले असता त्याचे कवच जळू लागते. यावेळी प्लास्टिकचा वास येतो.
३. प्लास्टिक अंड्याचा पिवळा बलक तव्यावर टाकला तरी तो पसरत नाही.
४. प्लास्टिक अंड्याचा आतील पिवळा भाग अधिक गडद रंगाचा असतो.
५. प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर या अंड्याचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो.