आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुलांना पौष्टिक आहार कसा द्यावा, हे जपानी पालकांना समजल्याने तेथील लहान मुले जगात सर्वात निरोगी आणि आनंदी मुले आहेत. येथील मुले इतर मुलांच्या तुलनेत जास्त जगतात. द लँसेट नावाच्या पत्रिकेत यासंदर्भातील अभ्यास प्रकाशित झाला आहे. जपानी पालक कोणत्या गोष्टींची काळजी घेतात ते जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
1 एकत्र जेवण करा
सर्वांनी एकत्र जेवण करावे. यामुळे मुलांमधील आणि पालकांमधील बाँडींगही चांगले होते.
2 जेवण वाढण्याची पद्धत
लहान मुलांना जेवण छोट्या प्लेटमध्ये द्यावे. त्यांना स्वत:च ताट वाढून घेण्याची सवय लावा. प्लेटही चांगली दिसावी जेणेकरुन त्यांची भूक आणखी वाढेल.
3 नवीन चव घेऊ द्या
एकसारख्या चवीचे पदार्थ खाऊन मुले लवकर कंटाळतात. त्यांना नवीन पदार्थ किंवा नवीन चव असलेले पदार्थ द्या. यामुळे लहान मुलांमध्ये हेल्दी डाएटबाबत आवड वाढते. नवीन टेस्ट करण्यात त्यांना कधीही अडचण येणार नाही.
4 शिस्त प्रमाणात असू द्या
मुलांना एखादी गोष्ट पसंत नसेल तर जबरदस्ती करू नका. कधी कधी मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ द्या. खाण्याबाबत जास्त शिस्त नको.