डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून 

eye

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही वेळा डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन जाते. डोळे कोरडे पडतात. डोळ्यांना खाज सुटते. या समस्येतूनच पुढे डोळ्यांना जखम होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आपल्याही डोळ्यांना खाज सुटत असेल, डोळे खूप लाल होत असतील, डोळे थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही खालील काही घरगुती उपाय करा.

१) कंप्युटरवर खूप वेळ काम केल्यावर डोळे थकल्यासारखे होतात. सतत एकटक कंप्युटरकडे बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. यावर उपाय म्हणून थोड्या वेळाने काम थांबवून डोळ्यांची उघडझाप करा.

२) सतत कंप्युटरवर काम करण्यासाठी अथवा वाहन चालवण्यासाठी एकटक बघावे लागते. खूप वेळ एकटक बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. डोळ्यांची उघडझाप ही सामान्य प्रक्रिया आहे. हवेसोबत डोळ्यात विविध प्रकारचा कचरा जातो. डोळ्यांची उघडझाप केल्यावर निर्माण होणारे अश्रू हा कचरा साफ करतात आणि डोळ्यांचा ओलावा कायम ठेवतात.

३) आपण आय स्पा वापरुन डोळ्यांचा कोरडेपणा कमी करू शकता. आय स्पा डोळ्यांना सुटणारी खाज, डोळ्यांचा थकवा, डोळ्यांचा कोरडेपणा यावर उपाय करतो. बाजारात विविध चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत.

४) वाहन चालवताना डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यात कचरा, धूर, धुलीकण जाण्याची शक्यता आहे. धुरामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होते. अश्रूंचे प्रमाण कमी होते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)