आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सणासुदीचा काळ आता सुरू झाला असून या काळात आरोग्य चांगले राहणे खुप महत्वाचे ठरते. विशेषत: महिलांनी या काळात आपले आरोग्य जपणे आवश्यक असते. सणासुदीत आजारपण आल्यास संपूर्ण आनंदावर विरजण पडल्यासारखे होते. हे टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. याकाळात कोणती काळजी याविषयी जाणून घेवूयात.
ही काळजी घ्या
१. पोषणयुक्त आहार घ्या. बाहेरचे खाऊ नका. फ्रीजमध्ये ताज्या आणि हिरव्या भाजीपाला ठेवा.
२. पचनक्रियेबरोबरच रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी व अतिरिक्त कॅलरीदेखील कमी करण्यासाठी रोज १०-१२ ग्लास पाणी प्या. यामुळे आरोग्य चांगले राहील. चेहरा सुद्धा चमकदार होईल.
३. किमान ३० मिनिटे पायी चालण्याचा व्यायाम करा.
४. ध्यानधारणा करा. व्यायाम करा. जास्त प्रमाणात मिठाई खाऊ नका. बाहेरील तळलेले पदार्थ खाऊ नका.
५. मद्यपान करू नका. यामुळे शरीरात चरबी जमा होते.
६. कॅलरीयुक्त खाणे टाळा. बाहेर जाताना काहीतरी खाऊन जा, यामुळे तीव्र भूक लागणार नाही.