आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हृदयरोगाला कारण ठरणाऱ्या खराब डीएनएचा एक भाग भ्रूणातून वेगळे करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. यामुळे सुमारे दहा हजार अनुवांशिक आजारांवर उपचार होऊ शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. या नव्या संशोधनातून नवे औषध तयार होण्याची शक्यता आहे.
संशोधक म्हणतात…
१) प्रत्येक पाचशे व्यक्तीत असा आजार असतो व त्यामुळे हृदय केव्हाही थांबू शकते.
२) डीएनएच्या कोणत्या तरी जीनमधील दोषामुळे, असे घडते. अशा आजाराच्या कोणत्याही व्यक्तीच्या मुलामध्येही तो होण्याची शक्यता ५० टक्के असते.
३) अनुवांशिकता सुधारण्याची ही प्रक्रिया गर्भ राहण्याच्या वेळेत केली गेली. हायपरटफीक कार्डियोमायोपॅथीने त्रस्त व्यक्तीचे वीर्य डोनेट केलेल्या निरोगी अंडाशयात इंजेक्शनद्वारे टाकले गेले व त्यासोबत दोष दूर करण्यासाठी क्रिस्पर तंत्रज्ञान वापरले गेले.
४) हा प्रयोग वारंवार यशस्वी ठरत नाही परंतु यामुळे ७२ टक्के गर्भांना फायदा झाला आहे. हे तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे हे आज सांगता येणार नाही. त्याला वेळ लागेल.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)