आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वप्नदोष ही सामान्य समस्या तरूणांमध्ये मोठ्याप्रमाणात आढळून येते. प्रत्येक वयोगटातील पुरुषांमध्ये आढळून येणारी ही समस्या ही सामान्य असली तरी वेळीच यावर उपचार केल्यास यातून मुक्त होता येते. अन्यथा याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. तसेच मानसिक ताण, थकवा, अंडकोषमध्ये दुखणे, कमजोर स्खलन आणि शीघ्रपतन आदी समस्या होऊ शकतात.
अशी घ्या काळजी
१) योग्य आहार घ्या. विटॅमिन बीयुक्त आहार भरपूर घ्यावा.
२) झोपण्याची आणि उठण्याचे वेळ निश्चित करा.
३)मन शांत ठेवा, पुस्तके वाचा, संगीत ऐका, मित्रांशी गप्पागोष्टी करा.
४) काही तज्ज्ञांच्या मते, झोपण्याअगोदर हस्तमैथुन केल्याने स्वप्नदोषाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
५) सेक्ससंबंधीत विचार न करणे आणि हस्तमैथुनचे प्रमाण कमी केल्यास ही समस्या बंद होऊ शकते.
हे आहेत नैसर्गिक उपाय
* तुळशीचे मुळ अथवा २ चमचे बीया संध्याकाळी पाण्यासोबत घ्या.
* काळ्या तुळसीचे १०-१२ पाने रोज रात्री पाण्यासोबत घ्या.
* दोन लसुन पाकळ्या ठेचून खा, थोड्या वेळाने गाजरचा रस प्या.
* आवळ्याचा मुरब्बा खाऊन त्यावर गाजरचा रस प्या.
* तुळसीच्या मुळाचे तुकडे बारीक वाटून पाण्यासोबत प्या.