आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शांत आणि पूर्ण झोप मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे. कारण अपुरी आणि कमी झोप सतत मिळाल्यास आरोग्य बिघडू शकते. प्रौढांना 7-8 तासांची झोप मिळणे आवश्यक असते. परंतु, अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. यास निद्रानाश असेही म्हटले जाते. काही घरगुती उपाय केल्यास झोप न येण्याची समस्या दूर करता येऊ शकते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्या. शांत झोप लागेल.
2 दूधामध्ये थोडे जायफळ टाकून ते दूध प्या. अथवा थोडे जायफळ उगळून ते मधासोबत घ्या.
3 केशर पाण्यामध्ये भिजवून ते पाणी प्या. अथवा केशर दूधासोबत घ्या.
4 जेवल्यानंतर एक केळे जरूर खा.
5 हर्बल चहामुळे झोपेशी निगडीत समस्या दूर होतात.
6 शरीराला मसाज केल्यास शांत झोप लागते.