आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दातांचे आरोग्य हे अतिशय महत्वाचे असते. कारण दातांचे आरोग्य बिघडल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी दात स्वच्छ केले पाहिजेत. अस्वच्छतेमुळे दातांना कीड लागते. यामुळे काहीही खाण्याची मोठी समस्या निर्माण होते. घरगुती उपायांनी दातांना लागलेली कीड घालवता येऊ शकते. हे उपाय जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
१) दालचीनीच्या तेलात कापूस भिजवून तो कीड लागलेल्या दातांत ठेवावा. यामुळे दुखणे थांबते. तसेच कीडसुद्धा नष्ट होते.
२) तुरटी, सेंधव मीठ आणि नौसागर समप्रमाणात घेऊन बारीक पावडर करावी. ही पावडर सकाळ-संध्याकाळ दात आणि हिरड्यांना लावल्यास कीड नष्ट होते.
३) कोमट पाण्यात तुरटी मिसळून गुळण्या केल्यानेही दातांची कीड आणि दुर्गंधी नष्ट होते.
४) वडाच्या झाडाचे दूध कीड लागलेल्या दातांवर लावल्याने कीड मरते.
५) हळदीची पुड आणि मीठ एकत्र करुन त्यात जवसचे तेल मिसळावे. ही पेस्ट घेवून दोन ते चार वेळेस दात घासावेत. यामुळे दातातील कीड मरतात.
६) लवंगचे तेल कापसाच्या बोळ्यात भिजवून कीड लागलेल्या दातावर ठेवल्याने कीड नष्ट होते.