आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा ही समस्या अलिकडे अनेकांना त्रासदायक ठरत आहे. लठ्ठपणा वाढला की, पोटावरील चरबी (Fat) वाढून शरीर अतिशय ओंगळवाणे दिसू लागते. पोटाची चरबी वाढण्याची विविध कारणे आहेत. एकाच ठिकाणी बसून काम करणे, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, ही याची प्रमुख कारणे आहेत. हे फॅट कमी करणे अवघड असते. पोटावरील फॅट कमी करण्याची सर्वात सोपी पध्दत अवलंबली तर १० दिवसात ४ किलो पोटाची चरबी (Fat) कमी करता येणे शक्य आहे. यासाठी एक खास चुर्ण खावे लागेल. हे चुर्ण घरीच बनवता येते.
हे आहे साहित्य
जवसाचे बीज
यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि भरपूर फायबर पोटाची चरबी कमी करण्यात मदत करतात. याचा वापर करण्यासाठी हे बीज भाजून घ्या.
जीरे
पुर्णपणे वाळलेले जीरे घ्या. जीरे मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि इम्यून सिस्टम मजबूत करते. यामुळे चरबी कमी होते.
ओवा
ओवा पोटासाठी खुप फायदेशीर असून तो चरबी कमी करण्यात मदत करतो.
असे तयार करा चुर्ण
३ चमचे जवसाचे बीज, २ चमचे जीरे, २ चमचे ओवा घ्या. जवसाचे बीज भाजून घ्या. हे तिन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करुन बारीक करा. हे चुर्ण पोटाची चरबी कमी करते. हे चुर्ण घेत असतानाच्या काळात जेवणापुर्वी आणि जेवणानंतर कोमट पाणी प्यावे. संपुर्ण दिवस परिपुर्ण पाणी प्यावे.
असे सेवन करा
एक चमचा चुर्ण नाष्टा करण्यापुर्वी कोमट पाण्यासोबत रोज घ्या. हे नियमित घेतल्याने पोटाची चरबी १० दिवसात ४ किलो कमी होते. हे दिवसातून २ वेळा घेतले तर आणखी लवकर फरक पडतो. एक चमचा सकाळी नाष्टयापुर्वी आणि एक चमचा रात्री जेवणापुर्वी घ्या.
ही काळजी घया
चुर्ण घेत असताना इतर थंड गुणधर्म असलेल्या पदार्थांचे सेवन करा. कारण जवस हे खुप गरम असते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे