आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सध्या खुप वाढले आहे. हा आजार कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो. चाळीशीनंतर याचा धोका आणखी वाढतो. बदलती जीवनशैली आणि आहारामुळे ही समस्या उद्भवते. आहारात दह्याचा समावेश केल्याने हा आजार टाळता येऊ शकतो. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. जे ब्रेस्टमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. अप्लाइड अँड एन्वायरोनमेंट मायक्रोबॉयलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
1 ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त आहे त्यांनी आहारात प्रोबायोटिक लॅक्टोबेसिलस समावेश करावा.
2 यामुळे ब्रेस्टमध्ये गुणकारी बॅक्टेरियांची पातळी वाढण्यास मदत होते.
3 ब्रेस्ट कॅन्सरने पीडित महिलांमध्ये एसचेरिचिया आणि स्टाफाइक्लोलोकोकस, जे हानिकारक बॅकिटेरिया म्हणून ओळखले जातात. त्यांची पातळी वाढलेली असते.
4 संशोधकांनुसार, कॅन्सरचा धोका वाढविण्यास बॅक्टेरियाला नष्ट करण्यात अॅन्टीबायोटिकच्या वापराने ब्रेस्ट कॅन्सरला आळा घालण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.