आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान मुलांना सिगारेटच्या धुरामुळे जन्मत:च बहिरेपणा येऊ शकतो. मुल पोटात असताना किंवा बाल्यवस्थेत असताना सिगारेटमधील निकोटिनशी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आल्यास त्यास बहिरेपणा येऊ शकतो.
तज्ज्ञ काय सांगतात
* निकोटीनचा जर गर्भावस्थेत किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर आईशी संबंध आला तर त्या बाळच्या मेंदूच्या ऑडिटोरी ब्रेनस्टेम या आवाज ऐकण्यासंबंधित भागाचा योग्य तो विकास होत नाही. त्याला ऐकू न येण्याचे व्यंग होते.
* गर्भवती असताना आईने धुम्रपान केले असेल आणि त्यांच्या मुलांना अभ्यासात जास्त अडचणी येत असतील तर त्यांनी ऑडिटोरी ब्रेनस्टेमची तपासणी करावी, असे तज्ज्ञ सांगतात.
* श्रवण यंत्रणेच्या इतर भागांवर निकोटिनचा कसा परिणाम होते याविषयी अद्याप सखोल माहिती नाही. त्यामुळे याविषयी आणखी संशोधन करण्याची गरज आहे.