आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जर तुमचे रागावर नसेल तर त्याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. अनेक संबंध बिघडत जातात. यामुळे तुम्ही एकटेसुद्धा पडू शकता. घर, कामाचे ठिकाण, समाज याठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही नेहमीच रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
फॉलो करा या खास टिप्स
१) रागात निर्णय घेणे टाळा
इंद्रियांना आराम द्या. यामुळे परिस्थिती समजून त्यावर योग्य निर्णय घेता येईल. रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका.
२) शांत आणि संयमी भाषा
परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करून शांत व सभ्यपणे बोला. महत्वाचे मुद्दे समजावून सांगा. दोष देणे टाळा.
३) दिर्घ श्वास घ्या
राग आल्यास दिर्घ श्वास घ्यावा. यामुळे इंद्रिये शांत झाल्याने रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. ही जुनी पद्धत खूप लाभदायक आहे.
४) डोके शांत ठेवा
राग गप्प राहून त्वरित डोके शांत करा. काहीही बोलू नका. राग शांत झाल्यानंतर योग्य किंवा अयोग्य काय यातील फरक लक्षात येतो.