आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्नायू मजबूत बनवण्यासाठी आहारात काही पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. या पदार्थांमधील न्यूट्रियंट्स स्नायू कमजोर करतात. चहा, कॉफी, मैद्यासारखे पदार्थांचे सेवन करू नये. दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिणे सुद्धा धोकादायक आहे. यामुळे स्नायू कमजोर होतात.
हे लक्षात ठेवा
* समोसे, कचोरी, पिझ्झामध्ये स्नायूसाठी आवश्यक कोणतेही प्रोटीन्स नाहीत. हे जास्त खाल्ल्याने स्नायू कमजोर होतात.
* प्रोटीनचे पदार्थ खावेत. आहारात रोज दूध, दही, पनीर काबुली चने आणि राजमा हे खावे. यात प्रोटीनसोबतच कॅल्शियम, फॉस्फरस असल्याने स्नायू बळकट होतात.
* स्नायू वाढवण्यासाठी आपल्या शरीरानुसार व्यायाम केल्याने फायदा होतो.
* आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. दूध, दही, फिश, बदामासारख्या पदार्थांनी स्नायू मजबूत होतात.
* स्नायू वाढवणारे औषध घेणे टाळावे. याचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. सिगारेट किंवा दारू प्यायल्याने मसल्स कमजोर होतात.
धुम्रपान टाळावे.
ही आहेत कारणे
१) सोड्यासारखे पदार्थ आहारात घेतल्याने हाडांचे आणि स्नायूंचे नुकसान होते.
२) गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास स्नायूंवर वाईट परिणाम होतो.
३) जास्त फळांचा रस प्यायल्याने स्नायू कमजोर होतात.
४) केक, आइस्क्रीमसारखे गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने स्नायू कमजोर होतात.