व्यायाम करण्याच्या अगोदर आणि नंतर घ्या ‘हा’ आहार
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपलं आरोग्य चांगलं रहावं या हेतूने प्रत्येकजण आपल्या आरोग्याची आपल्या पद्धतीने काळजी घेत असतो. पण व्यायाम करण्याच्या अगोदर काही खावं की नाही आणि व्यायामानंतर काय खावं हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे आपण सकाळी व्यायामाला जाताना काय खावं आणि आल्यावर काय खावं याबद्दल जाणून घेणार आहोत.
१) व्यायाम सुरू करण्यापूर्वी आणि व्यायामानंतर शक्यतो कॉम्प्लेक्स कर्बोदकांचे सेवन करावे यातून आपल्या शरीराला किमान २०० कॅलरीज मिळणे आवश्यक आहे.
२) व्यायामापूर्वीच्या आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असणारा आहार घ्यावा आणि व्यायामानंतरच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असावयास हवे. यामुळे आपले शरीर सुदृढ असायला हवे.
३) रिकाम्यापोटी व्यायाम करणे टाळावे कारण व्यायामासाठी आवश्यक उर्जा शरीरामध्ये अन्नाशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे व्यायामापूर्वी केळे किंवा उकडलेला बटाटा या सारख्या पदार्थांचे सेवन करावे.
४) एखाद्या व्यक्तीला जेवणाच्या शिवाय अधेमध्ये काहीही न खाण्याची सवय असते. अश्यावेळी व्यायामाच्या किमान २ तास आधी भोजन करून घेणे योग्य असते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचविण्यासाठी शरीराला पुरेसा अवधी मिळतो.
५) व्यायामानंतर आपल्या शरीरातील स्नायूंची खूपच ओढाताण झालेली असते. त्या स्नायूंना पुन्हा ताकद मिळण्यासाठी व्यायाम संपविल्यानंतरच्या एका तासामध्ये नाश्ता करणे आवश्यक असते. व्यायामामुळे शरीरातील खर्च झालेली उर्जा भरून निघण्यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रथिनांची गरज असते.
Comments are closed.