आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दीर्घायुष्यासाठी कामातून काही दिवसांची सुट्टी घेणे खुप गरजेचे आहे, फिनलँडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ हेलसिन्कीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात हे समोर आले आहे. या संशोधनातील संशोधक टीमो स्ट्रॅडबार्ग यांनी ही माहिती दिली आहे. हे पूर्ण करण्यासाठी सुमारे 40 वर्षांचा कालावधी लागला आहे. ज्यांनी 1 वर्षात 3 आठवड्यापेक्षा कमी सुट्टी घेतली त्यांच्या मृत्यूची शक्यता सुट्टीसंशोधन घेत असलेल्यांच्या तुलनेत 3 टक्के अधिक होती, असे या संशोधनात आढळून आले आहे.
सुट्टी गरजेची का आहे ?
1 सुट्टी न घेता सतत केली गेलेली मेहनत कोणतेही नुकसान पोहोचवणार नाही. कारण लाइफस्टाइल हेल्दी आणि आरोग्याची पुरेशी काळजी घेतो, हा समज चुकीचा आहे.
2 दीर्धायुष्य आणि स्ट्रेसपासून सुटका मिळवण्यासाठी केवळ हेल्दी डाएट आणि रेग्युलर एक्सरसाईज पुरेशी नाही. यासाठी कामातून सुट्टी आवश्यक आहे.
किती सुट्टी घ्यावी ?
1 वर्षात तीन आठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली, त्यांचा पुढील 30 वर्षात मृत्यूचा धोका 37 टक्के अधिक होता, असे संशोधकांना आढळून आले आहे.