आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लैंगिक आजाराबाबत कधीच कुणी उघडपणे बोलताना दिसत नाही. यामुळे या आजारांबाबत बरेच अज्ञान समाजात आजही दिसून येते. या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास अथवा लपवून ठेवल्यास पुढे त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. लैंगिक आजार म्हणजेच एसटीडीचे विविध प्रकार असून हे आजार संक्रमित व्यक्तीसोबत शारीरीक संबंध ठेवल्यास होतात. संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये काही बदल दिसून येतात. या आजाराच्या लक्षणांची माहिती आपण घेणार आहोत.
ही आहेत लक्षणे
* लैंगिक आजारात बुरशीमुळे त्वचा लालसर होते. मांड्यांजवळच्या भागावर खाज येते. यीस्ट संक्रमणामध्येही व्हरजायनामध्ये आणि पेनिसमध्ये खाज येते. खरुज झाल्यास रात्रीच्या वेळी अधिक खाज येते.
* टायकोमोनास व्हायरसच्या इनफेक्शनमध्ये सुद्धा गुप्तांगाला खाज, जळजळ, लालसरपणा व वेदना होतात.
* सिफलीस या विकारात योनीमार्ग व गुद्दवाराच्या मुखाच्या भागाला लाल किंवा तपकिरी रॅशेस येतात. हे रॅशेस हात व पायाच्या तळव्यांना देखील येतात.
* हार्पिस व्हायरस इन्फेक्शन झाल्यास जननेंद्रिये व गुद्दवाराच्या मुखाकडील भागावर छोटे पाणीदार फोड येतात. हे फोड लगेच फुटू शकतात. ओठांवर देखील लहान फोड येणे हेहार्पिस व्हायरस इन्फेक्शनचे एक लक्षण आहे.
* सिफलीस या विकारात जननेंद्रिय, गुदाशय, तोंड अथवा ओठ अशा इनफेक्शन झालेल्या भागाला वेदनारहित छोटे फोड येतात. दहा दिवसांनंतर हे फोड लालसर होतात. शरीरावर पेनी-साईज रॅशेस येतात.
* कॅनक्रोइड विकारात गुप्तांगाला वेदना होते. तसेच फोड येतात. एका दिवसामध्ये त्याचे रुपांतर पिवळसर राखाडी रंगाच्या अल्सरमध्ये होते.