आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हे वाचून तुम्हाला धक्का बसेल पण ते खरं आहे. टूथपेस्ट आणि साबणामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. यात अॅन्टी बक्टेरिअल आणि अॅन्टी फंगल तत्व असलेले ट्रायक्लोसन वापरले जाते. यामुळे मोठ्या आतड्यांना सूज येते. तसेच कॅन्सरसारखा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. अमेरिकेच्या मॅसाचुएट्स-एमहेर्स्ट युनिवर्सिटीत यासंबंधीचा प्रयोग करण्यात आला. या संशोधनाशी संबंधित संशोधक गुओडोंग झांग यांनी दिलेली माहिती आपण जाणून घेणार आहोत.
संशोधन आणि निष्कर्ष
1 ट्रायक्लोसनचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला.
2 ट्रायक्लोसनच्या फार कमी प्रमाणामुळेही उंदरांच्या आतड्यांना सूज येऊ लागली.
3 प्रयोगातील उंदरांचा आतड्यांशी संबंधित आजार वाढू लागला.
4 कालांतराने आतड्यांशी संबंधित कॅन्सरही उंदरांमध्ये दिसून आला.
5 या परिणामांमुळे असे स्पष्ट झाले की ट्रायक्लोसनचा आतड्यांवर परिणाम होतो.
6 ट्रायक्लोसनचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे विषबाधाही होऊ शकते.
7 याच्या कमी वापरामुळे होणारे परिणाम दिसून आले आहेत.