आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरूषांसाठी सेक्स पॉवर हा खुप महत्वाचा विषय आहे. जर सेक्स हेल्थ उत्तम असेल तर वैवाहिक जीवनही आनंदी होते. काही पदार्थांचे नियमित आणि योग्यपद्धतीने सेवन केले तर सेक्स पॉवरमध्ये चांगली वाढ होऊ शकते. अंडे खाणे हे आरोग्यासह कामेच्छा वाढविण्यासाठी सुद्धा लाभदायक असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. यातील व्हिटॅमिन बी-५, व्हिटॅमिन बी-६ मुळे सेक्स लाइफ सुधारते. परंतु, अंडे अन्य काही वस्तूंसह खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
* उकडलेल्या अंड्यात एक चमचा आल्याचा रस टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी खा.
* फ्राइड अंडे खाल्ल्याने कामेच्छा वाढते. म्हणजेच यौन इच्छा तीव्र होते.
* यासाठी अंड्यासोबत नेहमी गाजरचे सेवन करा. गाजर उकडलेल्या अंड्यामध्ये खिसून टाका. नंतर यामध्ये थोडे मध टाकून खा. महिन्यातून दोनदा हा उपाय करा.