आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दमा हा खुप त्रासदायक आजार असून या रूग्णांना सतत औषध जवळ ठेवावे लागते. मात्र, हा आजार दूर करण्यासाठी काही योगासने अतिशय परिणामकारक आहेत. ही योगासने नियमित केल्यास दम्याशी संबंधित आजारांना तुम्ही दूर ठेवू शकता. ही योगासने कोणती आणि त्याचे फायदे, याविषयी माहिती घेवूयात.
१) बध्धाकोनासन
हे आसन नियमित केल्याने मन शांत राहते, स्नायूंचा व्यायाम होतो, श्वसनक्रियेचा वेग वाढतो, फुफ्फुसांना फायदा होतो. हार्ट रेटदेखील कमी होतो.
२) अर्धमत्स्येंद्रासन
हे नियमित केल्याने कंबर, मान, पाय, पाठ आणि छातीच्या नसांमध्ये ताण निर्माण होतो. फुफ्फुसे खुलतात, श्वसन प्रक्रियेचा वेग वाढतो तसेच दमा दूर करण्यासाठी हे उपयोगी आहे.
३) मत्स्यासन
हे थॉयराइडवर लाभदायक आहे. थायरॉइड ग्रंथी आणि श्वासनलिका खुलते व श्वास घेण्यामध्ये त्रास होत नाही.
४) प्राणायाम
हे दम्याच्या रुग्णांसाठी लाभदायकही आहे. फुफ्फुसांमध्ये सुधारणा होऊन श्वास घेण्याची समस्या दूर होते. मनही शांत राहते.
५) भुजंगासन
यामुळे छाती रुंद होते. फुप्फुसे चांगल्याप्रकारे काम करतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. दम्याच्या आजारापासून यामुळे मुक्ती मिळू शकते.