आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मोबाईल, टीव्ही अशा गॅझेट्सचा वापर लहान मुले मोठ्या प्रमाणात करत असल्याने अनेक मुलांना चष्मा लागल्याचे दिसून येते. अयोग्य आहार व चुकीच्या सवयींमुळे मुलांच्या दृष्टीवर परिणाम होतो. म्हणून लहान मुलांकडे पालकांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, आणि यासबंधीतच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयी जाणून घेवूयात.
अशी घ्या काळजी
मुलांच्या डोळ्यांची तपासणी दर सहा महिन्यांनी करा.
१) शाळेत पाठविण्याअगोदर तर डोळ्यांची तपासणी केलीच पाहिजे.
२) मुलांना जास्त वेळ टीव्ही समोर बसू देऊ नका.
३) मुलांना शांत झोप लागेल याची काळजी घ्या.
४) मुले बाहेरुन आल्यावर डोळे पाण्याने स्वच्छ करण्यास सांगा.
५) डोळे लाल होणे, सतत डोळे चोळणे, अशी लक्षणे असतील तर डॉक्टरांकडे जा.
६) चष्मा असेल तर त्यावर ओरखडे किंवा डाग पडू देऊ नका. असल्यास बदलून घ्या.
७) टीव्ही बघताना, वाचत प्रकाश खूप जवळ नसावा.
८) मंद प्रकाशाचा वापर करू नका.
९) त्यांना पोषणतत्त्वयुक्त आहार द्या.
हे उपाय करा
* डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, सी, बीटा केरॉटीन, सेलेनियम आणि इतर पोषणद्रव्यांचा आहारात समावेश करा.
* गाजर, पालेभाज्या, पपई आणि द्राक्षे मुलांना जास्तीत जास्त द्या.