आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लैंगिक आजार म्हणजेच सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज (एसटीडी) हे असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतात. परंतु, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, शारीरीक संबंध न ठेवताही लैंगिक आजाराची लागण होऊ शकते. अशाप्रकारे लैंगिक आजार होण्याची कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१. ओरल सेक्स करताना पार्टनरच्या इन्फेक्टड भागाशी संबंध आल्यास गोनोऱ्हेया, क्लामीडीया, हार्पिस, हेपिटायटिस इत्यादी बॅक्टरीया, व्हायरस यांची लागण होते.
२. एसटीडी असलेल्या व्यक्तीने गुप्त भागात शेव्ह केल्याने त्वचेवर ब्रेक्स येतात आणि इन्फेकशनचा धोका वाढतो.
३. स्वच्छतागृहामध्ये इन्फेकशन पसरवणारे किटाणू, वस्तू असेल आणि ती जर ब्रेक्स असलेल्या त्वचेच्या संपर्कात आली तर लैंगिक आजाराचे इन्फेकशन होऊ शकते.
हे आजार होऊ शकतात
एचआयव्ही
इन्फेक्टड रक्ताशी संबंध आल्यास, इन्फेक्टड इंजेकशन्स किंवा सुया वापरल्यास, टॅटू करताना असुरक्षित सुई वापरल्यास एचआयव्हीचा धोका असतो.
गोनोऱ्हेया आणि क्लामीडीया
हे इन्फेकशन साधारणपणे ओरल सेक्स किंवा शारीरिक संबंधांमुळे पसरते. गरोदरपणात या इन्फेक्शनची लागण आईला झाली असेल तर बाळाला होऊ शकते.
हार्पीस
हार्पीस हा व्हायरस एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जवळचा संबंध आल्यास पसरतो. ओरल सेक्स, टूथब्रश, जेवणाची ताट, ग्लास इन्फेक्टड व्यक्तीसोबत शेअर केल्याने सुद्धा होऊ शकतो. तसेच आईमुळे बाळाला हा आजार होऊ शकतो.
हेपिटायटिस
हेपिटायटिस बी हा आजार अतिशय गंभीर असून इन्फेक्टड व्यक्तीच्या रक्त, सेमेन किंवा योनीतून आलेल्या द्रवाशी थेट संबंध आल्यास होतो. तसेच इन्फेक्टड व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास होतो.